गावातील नागरिकांनी पर्यटकांना करून दिली कोरोना संदर्भातील जाणिव
शहापुर : शहापुर तालुक्यातील विहिगाव जवळ असलेल्या अशोका धबधबा येथे जाण्यास कोरोनामुळे बंदी असूनही विशेषता शनिवार, रविवारी पर्यटकांची एकच झुंबड़ उडल्याचे दिसून आले.
कोरोना मुळे शहापुर तालुक्यातील अशोका धबधबा यासारख्या पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी आहे.असे असूनही नाशिक, ठाणे आदि ठीकाणाहुन पर्यटक येतात. सिनेअभिनेता शाहरुख खान आणि करीना कपूर यांच्या अशोका चित्रपटाचे शूटिंग या धबधब्यावर झाले होते त्यावरून याला अशोका नाव पडले.सध्या येथे पोलीस , वनविभागाची गस्त नसल्याचा फायदा घेत पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत. पण विहिगावच्या १० ते १२ गांवकरी यानी तेथे येऊन पर्यटकाना कोरोना प्रादूर्भावाची जाणीव करुन दिली आणि पर्यटकाना येथून परत जाण्यास सांगितले
369 total views, 2 views today